सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. ब्लॅक कॉफी किंवा दूध मिक्स करून बनवलेली कॉफी आवडीने प्यायली जाते. हे एक ठराविक पेय नसून ऊर्जा वाढवण्यासाठी प्याले जाणारे टॉनिक आहे. दिवसभरात काही लोक ३ ते ४ वेळा कॉफीचे सेवन करतात. पण कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कॉफीमधील कॅफिन शरीराला तात्कळ ऊर्जा देते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवसभरात किती कप कॉफी प्यावी? कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
दिवसभरात किती कप कॉफीचे सेवन करावे? जाणून घ्या कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती

कॉफी शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे मेंदू कायमच सक्रिय राहतो आणि सुस्तपणा पळून जातो. दिवसभरात योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होऊन जाते.

कॉफीमध्ये असलेले घटक लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक आणि फॅटी लिव्हरच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवून देतात. लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी एक कप ब्लॅक कॉफी नियमित प्यावी.

२४ तासांमध्ये २ कप कॉफी पिणे फायद्याचे मानले जाते. सुदृढ माणसाने दिवसाला ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करू नये. सतत कॉफीचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचू शकते.

कॉफीच्या सतत सेवनामुळे हात पाय थरथरणे, सतत चिडचिड वाढणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय कॉफीच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते.

सकाळी १० ते १२ च्या दरम्यान कॉफी पिणे फायद्याचे मानले जाते. तसेच दुपारी जेवणानंतर कॉफीचे अजिबात सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीराला हानी पोहचते.






