फळांचा राजा म्हणून जगभरात फेमस असलेला हापूस आंबा त्याच्या रसाळ आणि गोड चवीमुळे ओळखला जातो. हापूस आंबा पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आंब्याची चाहूल लागते. यामध्ये जीवनसत्त्व ए, सी आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पिकलेल्या हापूस आंब्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण सतत हापूस आंब्याचे सेवन केल्यास शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नियमित किती आंबे खावे आणि आंबे खाण्याची योग्य पद्धत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यात दिवसभरात किती आंबे खावे? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

हापूस आंबा किंवा इतर जातीच्या आंब्यांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी आंबा खाणे धोक्याचे ठरेल. आंब्याचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढेल.

वाढलेले कमी करताना आहारात आंब्याचे सेवन अजिबात करू नये. आंब्यामध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. एका आंब्यामध्ये सुमारे १५० ते २०० कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते.

आंब्यामध्ये खूप जास्त फायबर असते. अतिप्रमाणात आंब्याचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडू शकते. बद्धकोष्ठता, जुलाब आणि गॅस होऊ शकतो.

बऱ्याचदा आंब्याचा चीक न काढल्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, घशाला खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा डोळे लाल होणे इत्यादी इन्फेक्शन वाढू शकते. त्यामुळे दिवसभरात एकच आंबा खावा.

आंब्यामध्ये खूप जास्त उष्णता असते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अति रक्तस्त्राव किंवा पोटात खूप जास्त वेदना होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमीत कमी आंबे खावे.






