Instagram हे लोकप्रिय फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्रामवर आपण आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या फॅमिली आणि मित्र परिवारासोबत शेअर करू शकतो. आपण त्यांना आपल्या पोस्टमध्ये टॅग किंवा मेंशन देखील करू शकतो. तुम्ही देखील इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना अनेकदा टॅग किंवा मेंशन फीचरचा वापर केला असेल. पण आता आम्ही तुम्हाला एका नवीन फीचरबद्दल सांगणार आहोत. हे टॅग किंवा मेंशन नाही तर Collab फीचर आहे. खंर तर हे फीचर नवीन नाही. पण अजूनही अनेकांना या फीचरचा वापर कसा करावा हे माहिती नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता तुमच्या प्रियजनांच्या प्रोफाईलवरही दिसणार तुमची Instagram पोस्ट, टॅग किंवा मेंशन नाही तर अशा प्रकारे करा Collab
जेव्हा तुम्ही पोस्ट शेअर करताना तुमच्या मित्र परिवारासोबत Collab करता तेव्हा तुमचा फोटो त्यांच्या प्राफाईलवर देखील दिसू लागतो.
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Instagram ओपन करा. आता होमपेजवर दिसणाऱ्या प्लस आयकॉनवर क्लिक करा. आता पोस्ट ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला जो फोटो शेअर करायचा आहे, त्यावर क्लिक करा.
आता फोटोसाठी ऑडियो आणि फिल्टर सिलेक्ट करा आणि Next वर टॅप करा.
आता तुम्हाला स्क्रीनवर Tag People चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता Invite Collaboration ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला ज्या लोकांसोबत तुमचा फोटो Collab करायचा आहे, त्यांची नावं सर्च करा आणि सिलेक्ट करा.
त्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर टॅप करा आणि नंतर वरच्या उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा. आता Collab रिक्वेस्ट प्रथम त्या व्यक्तीकडे DM द्वारे जाईल आणि जर त्याने किंवा तिने रिक्वेस्ट स्वीकारली तरच फोटो किंवा व्हिडिओ त्याच्या प्रोफाइलवर दिसेल.