Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल 'या' सुंदर देशाची सहल; वाचा कसे? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
फक्त १०,००० रुपयांत भारतातून इराणमध्ये प्रवास करता येतो, आणि तिथे खर्चाची किंमत ५ पट जास्त लाभदायक ठरते.
इराणमध्ये अन्न, खरेदी, प्रवास आणि निवास सर्व परवडणारे आहे, त्यामुळे बजेटमध्येही राजेशाही अनुभव घेता येतो.
इराणचे हवामान, संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळे जगभरातील प्रवाशांसाठी अप्रतिम आकर्षण ठरतात.
Cheap International Travel : जगात प्रत्येकाला परदेशभ्रमंती (Foreign travel) करण्याची इच्छा असते. पण बहुतेकांना वाटतं की परदेशात फिरण्यासाठी लाखो रुपये लागतात, बजेट ओलांडतं आणि खर्चाचा ताण येतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भारतातून फक्त १०,००० रुपयांत तुम्ही एका परदेशात सहल करू शकता, आणि तिथे तुमचे पैसे पाचपट जास्त मूल्य देतात? होय, हे सत्य आहे, आणि हा देश म्हणजे इराण(Iran).
इराण हा जगातील तो देश आहे जिथे भारतीय रुपयाचे मूल्य खूपच मजबूत ठरते. त्यामुळे कमी पैशांतही प्रवासी तिथे खूप काही अनुभवू शकतात. तुमच्या खिशातील १०,००० रुपये इराणमध्ये जवळपास ५०,००० रुपयांचा अनुभव देऊ शकतात.
इराणची खाद्यसंस्कृती हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. येथील स्ट्रीट फूडपासून ते पारंपारिक रेस्टॉरंट्सपर्यंत सर्व काही अत्यंत परवडणारे आहे. स्वादिष्ट कबाब, केसरयुक्त पुलाव, पारशी मिठाई आणि गरमागरम ब्रेड यांचा आस्वाद घेताना तुमचं बजेट अजिबात ओझं वाटणार नाही. भारतीय प्रवाशांसाठी इराणी अन्न हे स्वाद आणि आरोग्याचा सुंदर संगम ठरतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zaporizhzhia Nuclear Plant : युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तीन दिवसांपासून अंधारात; संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा
प्रवास म्हटला की खरेदी ही आलाच! इराणमध्ये तुम्हाला हस्तनिर्मित कार्पेट, पारंपारिक कपडे, झगमगती चांदीची भांडी, स्थानिक हस्तकला हे सर्व अतिशय कमी किमतीत मिळतं. विशेष म्हणजे, ही वस्तू केवळ आठवण म्हणूनच नव्हे तर तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी अनमोल ठरतात.
इराणमधील वाहतूक व्यवस्था प्रवाशांसाठी अतिशय सोयीची आणि स्वस्त आहे. बस, मेट्रो, टॅक्सी यामुळे शहरांमध्ये सहज फिरता येतं. त्यामुळे पर्यटनस्थळांना भेट देताना खर्चावर नियंत्रण ठेवता येतं.
आजच्या काळात प्रवास म्हणजे फक्त अनुभव नाही तर तो जगभर दाखवण्याची संधी देखील आहे. जर तुम्हाला फोटोशूट किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंगची आवड असेल, तर इराणमध्ये प्रत्येक गल्ली, ऐतिहासिक स्मारक आणि निसर्गरम्य ठिकाण इंस्टाग्रामसाठी परफेक्ट ठरतो.
इराणमध्ये हिवाळा असो वा उन्हाळा, प्रवासासाठी हवामान उत्तम असतं. परवडणाऱ्या हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि हॉस्टेल्स प्रवाशांना आरामदायी अनुभव देतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Taiwan War : चीन लवकरच करणार तैवान काबीज; 800 पानांच्या एका कागदपत्रातून ड्रॅगनची कुटील योजना आली जगासमोर
जर तुम्ही परदेश प्रवासाचं स्वप्न पाहत असाल, पण जास्त खर्च परवडत नसेल, तर इराण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कमी बजेटमध्ये तुम्हाला येथे इतिहास, संस्कृती, स्वादिष्ट अन्न, खरेदी आणि साहस या सर्वांचा अनोखा संगम अनुभवता येईल.
१०,००० रुपयांची सहल तुम्हाला इथे ५०,००० रुपयांच्या आलिशान अनुभवाइतकी समाधानकारक ठरू शकते.