अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी (फोटो- सोशल मीडिया)
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी
तामिळनाडूतील रॅलीत 11 लोकांचा मृत्यू
30 पेक्षा जास्त नागरिक जखमी
Actor Vijay Rally Stampede : तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता विजय याच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये लहान मुलांसह तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झालत्याचे म्हटले जात आहे. अभिनेता विजय याच्या रॅलीमध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये एक नऊ वर्षांचा मुलगा देखील बेपत्ता झाल्याचे समजते आहे.
TVL पक्षकहे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेता विजय यांच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. विजय यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. गर्दी टिकी वाढली की त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. अभिनेता-नेता विजय रॅलीमध्ये संबोधित करत असताना अचानक रॅलीमध्ये काही नागरिक बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना भाषण थांबवावे लागले. त्यानंतर ते रॅलीमधून निघून गेले.
VIDEO | Tamil Nadu: Stampede-like situation was witnessed, and many persons, including a few children, fainted in Karur as a massive crowd gathered for TVK chief and actor Vijay's speech. The fainted persons were rushed to nearby hospitals in ambulances, and some of them are… pic.twitter.com/DFGH1oH0BI — Press Trust of India (@PTI_News) September 27, 2025
गर्दीत श्वास घेणे झाले कठीण
या रॅलीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली की लोकाना श्वास घेणे देखील कठीण झाले. रॅलीमधील लोक अचानक बेशुद्ध होऊन खली पडू लागले. त्यानंतर विजयने भाषण थांबवले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. त्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकांना मदत करण्याची सूचना केली.
गोव्यातील देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेली चेंगराचेंगरी
गोवा शिरगावातून मोठी घटना घडली. गोव्यातील शिरगाव येथे लाराई जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला होता. . या घटनेत १० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. चेंगराचेंगरी कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, जत्रेत उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये झालेली चेंगराचेंगरी ही विजेचा धक्का बसल्याच्या अफवेमुळे झाल्याचे मानले जात होते.