आपला स्मार्टफोन सतत हँग होत असेल किंवा त्यामध्ये नेटवर्क येत नसेल तर आपण फोन रिस्टार्ट करतो. सहसा फोनमधील पावर बटणच्या मदतीने ही प्रोसेस पूर्ण होते. पण फोनमधील पावर बटण काम करत नसेल तर काय करणार. पावर बटणचा वापर न करता देखील तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचा स्मार्टफोन रिस्टार्ट करू शकता. ही संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: Power Button चालत नाहीये? या सोप्या ट्रिकने काही मिनिटांत रीस्टार्ट करा तुमचा Android फोन

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनची सेटिंग ओपन करा. त्यानंतर अॅक्सेसिबिलिटी ऑप्शन सिलेक्ट करून अॅक्सेसिबिलिटी मेनू वर जा.

आता तुम्हाला स्मार्टफोनच्या स्क्रीनवर एक छोटा फ्लोटिंग आयकॉन दिसेल.

या आयकॉनवर टॅप केल्याने पॉवर पर्यायांसह अनेक नियंत्रणे दिसून येतील.

आता फक्त Restart वर टॅप करा आणि तुमचा फोन रीस्टार्ट होईल.

अशा पद्धतीने तुम्ही पावर बटणचा वापर न करता देखील तुमचा स्मार्टफोन रिस्टार्ट करू शकता.






