टेक कंपनी Huawei ने चीनमध्ये त्यांचा आणखी एक नवीन 5G फोन Huawei Pura 90 Plus लाँच केला आहे. कंपनीने त्यांच्या नव्या Pura 90 सीरीजअंतर्गत हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 12GB + 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 1TB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. डिव्हाईसमध्ये 1-इंच टाइपचे सेंसर आणि वेरिएबल अपर्चर देखील मिळणार आहे. या नव्या हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: Huawei)
DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा अन् 100W चार्जिंग! Huawei चा प्रीमियम स्मार्टफोन पाहून थक्क व्हाल, मिळणार खास फीचर्स

हुवावे पुरा 90 प्लसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 73,500 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 80,500 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 94,000 रुपये आहे.

नवीन स्मार्टफोन डॉन गोल्ड, ऑब्सीडियन ब्लॅक, स्नो व्हाइट आणि सनसेट पर्पल रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

नव्या हुवावे पुरा 90 प्लस स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच एलटीपीओ ओएलईडी फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसचा एडेप्टिव रिफ्रेश रेट 1Hz से 120Hz पर्यंत जाऊ शकतो.

हुवावे पुरा 90 प्लसच्या मागील बाजूला क्वाड-कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आणि f/1.6 ते f/4.0 पर्यंत वेरिएबल अपर्चर देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 40-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 1.5-मेगापिक्सेलचा 'रेड मेपल' मल्टीस्पेक्ट्रल सेंसर देखील मिळणार आहे.

स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,700mAh बॅटरी दिली आहे.

कनेक्टिविटीसाठी स्मार्टफोनमध्ये वाय-फाय 7, ब्लूटूथ 6.0, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि चीनमध्ये सॅटेलाइट मेसेजिंगचा सपोर्ट देखील मिळणार आहे.






