भारतातील पेट्रोलचे दर आता गगनाला भिडले आहेत. बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर आता 100 रुपयांच्या वर जाताना दिसून येत आहेत. अशात जगात असे काही देशही आहेत जिथे पेट्रोल पाण्याहून कमी किमतीत पेट्रोल विकले जाते. याचे मूळ कारण म्हणजे तिथे असलेले तेलाचे साठे. यात कोणकोणत्या देशांचा समावेश आहे ते जाणून घ्या.
Cheap Petrol Price: कुठे 2 रुपये तर कुठे 3 रुपये; या देशांमध्ये चिंदीभावाने विकले जाते पेट्रोल
इराण हा जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल विकणारा देश आहे. येथे पेट्रोलचा दर फक्त 2.51 रुपये प्रतिलिटर आहे. येथे असणारे तेलाचे प्रचंड साठे आणि सरकारी अनुदानामुळे इराणमध्ये पेट्रोल इतके स्वस्त किमतीला विकले जाते
लिबिया हा आफ्रिकेतील सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश आहे. येथे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 2.51 रुपये आहे. तथापि, इथे अनुदानित पेट्रोलची तस्करी ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे सरकारच्या कमाईचे नुकसान होते
दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये देखील सर्वात कमी किमतीला पेट्रोलची विक्री होते. इथे पेट्रोलचा दर प्रति लिटर 3.03 रुपये इतका आहे. इथेही जगातील सर्वात मोठ्या तेलाचा साठा आहे आणि सरकार तेथील लोकांना जवळपास मोफत पेट्रोल पुरवते
त्याचबरोबर अंगोला या देशात पेट्रोलची किंमत 28.44 रुपये प्रति लिटर आहे. हा आफ्रिकेतील सर्वोच्च तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. इथे सरकार इंधनावर सबसिडी देते, जेणेकरून ग्रामीण भागातही ते सुलभ करता येईल. परंतु आर्थिक विषमतेमुळे प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ मिळत नाही
इजिप्तमध्ये पेट्रोलची किंमत 29.39 रुपये प्रति लिटर आहे. इजिप्तचा समावेश तेल उत्पादक आणि वापर करणाऱ्या देशांमध्ये होतो. त्यामुळे इथल्या तेलाच्या किमती जगाच्या तुलनेत कमी आहेत. सरकार गरीब घटकांना पेट्रोल सबसिडी देते. मात्र, अलीकडच्या आर्थिक सुधारणांमुळे अनुदानात कपात केली जात आहे