
संध्याकाळच्या चहासाठी काही मिनिटांमध्ये बनवा टपरीसारखा कडक तंदूर चहा,नोट करून घ्या रेसिपी
जगभरात असंख्य चहाप्रेमी आहेत. चहा प्यायल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. काहींना दुधाचा चहा पिण्याची सवय असते तर काहींना ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा वेगवेगळ्या हर्बल टी चे सेवन करण्याची आवश्यकता असते. थंडीत प्रत्येकालाच कडक चहा प्यायला हवा असतो. चहाचे सेवन केल्यामुळे झोप उडून जाते आणि फ्रेश वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या चहासाठी फक्कड तंदूर चहा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळे मसाले आणि दुधाचा वापर करून बनवलेला चहा चवीसोबतच डोकेदुखी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी मदत करतो. तंदूर चहाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि मन कायमच फ्रेश राहते. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच गरमागरम मसाला चहा पिण्यास हवा असतो. त्यामुळे कायमच बाहेरील टप्परीवर चहा पिण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीसुद्धा तंदूर चहा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया तंदूर चहा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Winter Special Recipe: १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक गाजर पचडी, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी
कृती:
तंदूर चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात सर्व खडे मसाले टाकून उकळवण्यासाठी ठेवा.
खलबत्यामध्ये सुंठ, आलं आणि तुळशीची पाने घालून बारीक करा. तयार केलेले मिश्रण टोपात टाकून उकळवून घ्या.
त्यानंतर त्यात चहा पावडर घालून चहाचा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित उकळवून घ्या. खडे मसाले उकल्यानंतर त्यांचा सुगंध सगळीकडे पसरेल.
तयार केलेल्या चहामध्ये साखर आणि दूध घालून चहा उकळवा. चहाचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
मातीचे भांड गॅसवर गरम करून घ्या. त्यानंतरउकळलेला चहा मातीच्या भांड्यात ओतून सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पक्कड तंदूर चहा.