अनेक लोक मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नाही. मांस, सीफूड किंवा दुग्धजन्य पदार्थ इत्यादी पदार्थांचे सेवन न करणारे असंख्य लोक आहेत. त्यामुळे मांसाहार न करणाऱ्या लोकांच्या शरीरात अनेकदा प्रथिनांची कमतरता जाणवते. शरीरामध्ये प्रथिनांची कमतरता जाणवू लागल्यानंतर शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात. यामुळे स्नायूंच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात करा समावेश
प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात टोफूचे सेवन करावे. टोफू ला पदार्थ शाहाकारी असल्यामुळे तुम्ही या पदार्थाचा रोजच्या आहारात समावेश करू शकता. टोफूपासून टोफू करी, सॅलड, क्रिस्पी बेक्ड टोफू किंवा टोफू सँडविच इत्यादी अनेक पदार्थ बनवता येतात.
पीनट बटर मध्ये 25 ग्रॅम प्रथिने आढळतात. तसेच कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहाचे रुग्ण सुद्धा पीनट बटर खाऊ शकतात. स्नायूंच्या विकासासाठी पीनट बटर फायदेशीर आहे.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि अँटी-ऑक्सिडेंट असते, त्यामुळे मांसाहार न करणाऱ्या लोकांनी रोजच्या आहारात भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. स्नायूंच्या वाढीस मदत होते.
लाला रंगाच्या कोबीमध्ये विटामिन सी, ए के जास्त प्रमाणात आढळून येतात. लाल कोबीचे सेवन केल्यामुळे शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर होते.
मसूरमध्ये जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. रोजच्या आहारात डाळीचा समावेश केला जातो. त्यामुळे तुम्ही मिश्रण कडधान्यांपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.