ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे…
पोलीस कारवाई करत नाही म्हणून उकळायचे पैसे
नवी मुंबईत पोलीसांनी धाड टाकली. तेव्हा घरात महिला एकटी झोपलेली होती. महिला पोलीस कर्मचारी पण सोबत होते. बांगलादेशची असणारी पण गेल्या १२ वर्षापासून अस्मा पॉली ही कोपरी गाव इथ राहत आहे. नवी मुंबई कोपरी गाव सेक्टर २६ मध्ये ती राहत होती. मात्र तुझ्यावर कारवाई करणार म्हणून पोलीसांनी या आधी तिच्या मैत्रिणीकडून जवळपास ५ लाख रुपये काढले होते. मात्र घरात कारवाई करत असताना एक एजेंट हा पोलिसांच्या सोबत होता. जेव्हा असमा ला पोलीसांनी गाडीत बसवलं तेव्हा घराची सदा झडती करण्यात आली. मात्र तिने पोलीस तक्रारी जे काही सांगितलं ते मात्र धक्कादायक होते.
घरातील १० तोळ सोन आणि २० ते २५ लाख रुपये झाले गायब
मुलीने घरात जमवलेले पैसे गायब झाल्याने तिला संशय आला. तेव्हा हे प्रकरण अंगलट येईल म्हणून पोलिसांनी ती काम करत असलेल्या बार मालकाला बोलावून घेतलं आणि घरात ६ लाख रुपये आणि हार असल्याचं सांगितलं. मात्र घराची झाडा झडती केलेला कर्मचारी हा उडवा उडवीची उत्तर देत होता. मात्र जेव्हा तिने पोलीसात तक्रार दिली तेव्हा ४ पोलिस कर्मचाऱ्यांनी हा सगळा बनाव रचला होता. जवळपास १० तोळे सोने आणि पैशांवर डल्ला करायचा होता. मात्र तो काय यशस्वी झाला नाही. आता आरसीएफ पोलीस ठाण्यात ४ पोलीस कर्मचारी एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या नावावर पोलीसच दरोडे टाकत असल्याने आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र पोलीसांवरच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशात सगळीकडे रोहिंग्याच्या विरोधात कारवाई
देशाच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने सगळ्या राज्यांना आदेश देत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात याची मोहीम सुरू होती. मात्र पोलीस च कारवाई करण्याच्या बहाण्याने धाड टाकत असतील तर हे मात्र धक्कादायक आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास आता आरसीएफ पोलीस करत आहेत.
कंपनी ठेकेदाराच्या बाऊन्सरांकडून महिला शेतकऱ्यांना दमदाटी; जमिनीत बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न
Ans: नवी मुंबईतील कोपरी गाव, सेक्टर 26 परिसरात.
Ans: कारवाईच्या बहाण्याने छापा टाकून पोलिसांनी सोने व रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप आहे.
Ans: या प्रकरणाचा तपास आरसीएफ पोलीस करत आहेत.






