फेसबुक हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आज जवळजवळ प्रत्येकजण फेसबुक वापरतो. फेसबुकवर अनेक सुरक्षा फीचर्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे अकाऊंट हॅकर्सपासून सुरक्षित ठेवू शकता. तथापि, अशी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत ज्यांचा वापर करून कोणीही तुमचे फेसबुक नियंत्रित करू शकते. खरंतर, हे फेसबुकचे सुपरव्हिजन फीचर आहे, जे मेटाने मुलांच्या सुरक्षेसाठी लाँच केले आहे. बरेच युजर्स या वैशिष्ट्याचा गैरवापर करू शकतात. या फीचरचा वापर करून कोणी तुमचं फेसबूक नियंत्रित करत आहे का, हे तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून जाणून घेऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या Facebook अकाऊंटवर दुसऱ्याचा कंट्रोल आहे का? अशा प्रकारे लगेचच करा Check
सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक उघडा.आता तुम्हाला फेसबुकच्या वरच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करावे लागेल.
यानंतर, तुमच्या नावावर टॅप करा. आता "Edit Profile" च्या शेजारी दिसणाऱ्या 3 बिंदूंच्या चिन्हावर क्लिक करा.
येथे तुम्हाला अॅक्टिव्हिटी लॉगचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला कनेक्शनचा पर्याय दिसेल.
कनेक्शन्सवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सुपरव्हिजन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता फेसबुकवरील सुपरव्हिजन या पर्यायावर जा. तुमच्या फेसबुकवर लक्ष ठेवणाऱ्या आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीची माहिती येथे तुम्हाला मिळेल.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फेसबुक अकाउंटवरून काही अॅक्टिव्हिटी होत आहे जी तुम्ही केलेली नाही. तर हे शक्य आहे की कोणीतरी दुसरेच तुमचे फेसबुक नियंत्रित करत असेल.