सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि इंडियन टेलिव्हिझन सृष्टीचा सुंदर असा चेहरा रश्मी देसाईचा आज वाढदिवस आहे. आजपर्यंत या चेहऱ्याने Indian TV Industry मध्ये कहरच केला आहे. आज रश्मीचा फार मोठा चाहतावर्ग आहे. उत्तरन, दिल से दिल तक, उडानसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रश्मी देशातील घराघरात पोहचली आहे.
रश्मी देसाईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! ( फोटो सौजन्य - Social Media)
रश्मीने तिच्या अभिनयाची सुरुवात 'कन्यादान' या असामी भाषेतील चित्रपटातून केली. या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
पुढे, 'यह लम्हे जुदाई के' या हिंदी चित्रपटातून रश्मीने बॉलीवूड नगरीत पदार्पण केले. तसेच येथून तिच्या हिंदी सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली.
२००६ मध्ये रश्मीने भारतीय TV सृष्टीत पाऊल ठेवले. झी TV वरील 'रावण' या मालिकेतून रश्मीने TV Debut केले. रश्मीला ओळख आणि प्रसिद्धी तिच्या उत्तरंन या मालिकेतून मिळाली.
रश्मीने BIG BOSS, नच बलिये तसेच झलक दिखला जा आणि बरेच शो केले आहेत. तसेच अनेक म्युजिक व्हिडिओमध्ये कामही केले आहे. रश्मीला अनेक अवार्डही मिळाले आहेत.
रश्मीला २०१२ साली अप्सरा अवॉर्ड या पुरस्कारने पुरस्कारित करण्यात आले होते. तसेच तिला 'इंडियन टेली अवॉर्ड्स', 'गोल्ड अवॉर्ड्स' अशा बरेच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.