सध्या बदलापूर हे नाव फार चर्चेत आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीजवळ हे शहर वसले आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून हे देशात शहर आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे शहर देशाच्या दक्षिणेस वसलेले आहे. मात्र शहराचे नाव बदलापूर असे आगवेगळे का ठेवण्यात आले? नाही... तर मग नावामागची रंजक कथा आज जाणून घ्या.
Badlapur : शहराचे नाव बदलापूर कसे पडले? काय आहे कहाणी, जाणून घ्या
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. इथे चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचारामुळे येथील स्थानिकांनी आंदोलन केले , ज्यामुळे तिथे घडलेल्या प्रकाराची देशाला आणि काही महत्वाच्या लोकांना दखल घ्यावी लागली.
मात्र बदलापूर या नावामागे एक मोठे गूढ लपलेले आहे जे अधिकतर लोकांनी ठाऊक नाही. आज आम्ही तुम्हाला याच्या नावामागची एक रंजक गोष्ट सांगत आहोत
असे सांगितले जाते की महाराज्यांच्या काळात मराठे त्यांचे सैनिक हे आपले घोडे या ठिकाणी बदलायचे, ज्यामुळे या जागेचे नाव बदलापूर असे पडले. महाराज्यांच्या काळात बदलापूरला जास्त महत्त्व नव्हते. या जागेला फक्त ते लहान-मोठ्या कामासाठी वापरायचे.
बदलापूर जरी त्याकाळचे महत्तवाचे ठिकाण नसले तरीही येथे अनेक महत्त्वाच्या घटना घडून गेल्या आहेत. या घटनांची नोंद बखरींमध्ये केलेली आढळते
काही पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये ‘मौजे बदलापूर उर्फ चोण’ असा बदलापूरचा उल्लेख आढळतो. सन 1738-39 च्या सुमारास रामचंद्र हरी पटवर्धन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ‘मुक्काम बदलापूर’ असे लिहिल्याचा उल्लेख आढळतो