मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जात आहेत यावर आरक्षणाची करते विनोद पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतायेत की मनोज जरांगे हे रस्त्यावरील लढाई लढताय तर मी न्यायालयीन लढाई लढतोय आमच्या दोघांची लढाई एकच आहे.बोलताना विनोद पाटील म्हणाले की, सरकारने याच्यावर तोडगा काढला तर नक्कीच आम्ही ही लढाई जिंकणार. न्यायालयाच्या निकालावर टिपणी करणे मला योग्य वाटत नाही. आम्ही न्यायालयाच्या विरोधात नाही.मागच्या वेळेस मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये काही चर्चा झाली माहीत नाही पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आपला विजय झाला आणि आपण गुलाल उधळायचं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गुलाल उधळला. पण त्यांनीच नंतर पाच सहा महिन्यानंतर सांगितले की आपला निर्णय चुकलेला आहे.त्यावेळेस त्यांचं काय ठरलं हे ते दोघेच उत्तर देऊ शकता. मराठा आणि ओबीसी समाजाच्या दोन्ही समाजाच्या नेत्यांनी पुढे येऊन समाजातली धुरी दूर होण्यासाठी प्रयत्न करावे, असं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.