संधिवाताच्या समस्येपासून मिळेल कायमचा आराम! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या 'या' २० रुपयांच्या भाजीचे पाणी
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगा खाण्याचा सल्ला दिला जातो. या शेंगा आरोग्यासाठी वरदान ठरतात. दैनंदिन आहारात नियमित शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यास शरीराला अनेक महत्वपूर्ण फायदे होतात. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे अपुरी झोप आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी आजार झाल्यानंतर शरीर कमकुवत होऊन जाते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केले जातात. पण यासोबतच तुम्ही आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर शेवग्याच्या भाजीचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
गॅसमुळे सतत पोटात जडपणा जाणवतो? मग ‘हे’ उपाय करून कायमचा मिळवा आराम, पोट राहील स्वच्छ
शेवग्याच्या शेगांसोबतच भाजीचे सुद्धा सेवन केले जाते. चवीला कडू लागणारी भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरते. या पानांमध्ये विटामिन ए, बी, सी,कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळून येते. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी शेवग्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे वारंवार होणारा संसर्गाचा धोका कमी होतो. याशिवाय केसगळती, त्वचाविकार किंवा हाडांमधील कमजोरी कमी होते. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायले जाते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
वाढत्या वयात हाडे कमकुवत होऊन जातात. हाडांमध्ये वाढलेली कमजोरी दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यावे. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि विटामिन के हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. संधिवात, हाडं ठिसूळ होणं किंवा हाडांची घनता कमी होणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या पाण्याचे सेवन करावे. हाडे मजबूत ठेवण्यासाठी शेवग्याची पाने गुणकारी ठरतात.
एक ग्लास पाणी टोपात गरम करून घ्या. गरम केलेल्या पाण्यात शेवग्याची पाने टाकून १५ मिनिटांपर्यंत उकळवून घ्या. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पाणी गाळून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. संधिवाताच्या वेदना आणि वजन कमी करण्यासाठी शेवग्याचे पाणी प्रभावी ठरते. शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही करू नका ‘या’ फळांचे सेवन, नैसर्गिक साखरेमुळे शरीराला पोहचेल हानी
संधिवात म्हणजे काय?
सांध्यांमध्ये हाडे एकमेकांवर घासली जातात आणि यालाच आपण संधिवात म्हणतो. हाडांच्या कडांवर असलेली गुळगुळीत कूर्चा (Cartilage) झिजल्यामुळे हाडे एकमेकांवर घासतात, ज्यामुळे वेदना होतात.
संधिवाताचे प्रकार आणि कारणे?
हा सांध्यांच्या कूर्चेच्या झिजेमुळे होतो. वाढत्या वयामुळे किंवा सांध्यावर जास्त ताण आल्याने हा आजार होतो. हा एक स्वयंप्रतिकार (Autoimmune) आजार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून सांध्यांच्या अस्तरावर (Synovial membrane) हल्ला करते.