फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय संघाचे काही आंतरराष्ट्रिय सामने सुरु आहेत तर टीम इंडिया अ च्या देखील मालिका खेळवल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर भारतामध्ये देखील काही देशातंर्गत स्पर्धा खेळवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक नवे युवा खेळाडू हे पाहायला मिळत आहेत. २०२५-२६ रणजी ट्रॉफी सुरू आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात अष्टपैलू आकाश चौधरीने इतिहास रचला. चौधरीने अवघ्या आठ चेंडूत उत्तुंग षटकार मारून विश्वविक्रम केला. त्याच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
असे म्हटले जात आहे की आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात चौधरी मोठा पैसा जिंकू शकतो. अनेक फ्रँचायझी त्याच्यावर करोडो खर्च करण्यास तयार असतील.
🚨 Record Alert 🚨 First player to hit eight consecutive sixes in first-class cricket ✅ Fastest fifty, off just 11 balls, in first-class cricket ✅ Meghalaya’s Akash Kumar etched his name in the record books with a blistering knock of 50*(14) in the Plate Group match against… pic.twitter.com/dJbu8BVhb1 — BCCI Domestic (@BCCIdomestic) November 9, 2025
मेघालयचा स्टार फलंदाज राहुल दलाल १०२ चेंडूत १४४ धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि आकाश कुमार चौधरी मैदानात आला. त्याने पहिला चेंडू डॉट म्हणून खेळला आणि पुढच्या दोन चेंडूंवर एकेरी धाव घेतली. त्यानंतर, गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या लिमार डाबीच्या एका षटकात त्याने सहा षटकार मारले. त्यानंतरही, तो थांबला नाही आणि पुढच्या दोन चेंडूंवर एक षटकार मारला, ज्यामुळे त्याने फक्त ११ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फक्त रवी शास्त्री आणि सर गॅरी सोबर्स यांनी सहा चेंडूत सहा षटकार मारले होते.
याआधी, सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम लेस्टरच्या विन नाईटच्या नावावर होता. त्याने १२ चेंडूत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकले. मेघालयकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या आकाश चौधरीने ३० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५०३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ८७ विकेट्सही घेतल्या आहेत. २५ वर्षीय या खेळाडूने २८ लिस्ट ए सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने बॅटने फक्त २०३ धावा केल्या आहेत, तर बॉलने ३७ विकेट्सही घेतल्या आहेत.
३० टी-२० सामन्यांमध्ये आकाशने बॅटने १०७ धावा केल्या आहेत आणि बॉलने २८ विकेट्स घेतल्या आहेत, ज्याचा इकॉनॉमी रेट ७.९४ आहे. अलिकडच्या काळात आकाशने त्याच्या फलंदाजीवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे.






