सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? 'या' तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश
दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीरात खूप जास्त अशक्तपणा आणि वेदना जाणवू लागतात. तसेच शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या अभावामुळे आरोग्य बिघडून जाते. कॅल्शियम किंवा इतर आवश्यक विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडे दुखणे, कंबर दुखणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक गंभीर बदल होऊ लागतात. मासिक पाळीच्या समस्या, हाडांची झीज, त्वचेवरील तेज कमी होणे, थकवा वाढतो आणि ताण जाणवणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे वय वाढल्यानंतर शरीराची योग्य काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच औषध उपचार करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला हानी पोहचत नाही. वारंवार हाडांमध्ये वाढलेल्या वेदना आणि अंग दुखीपासून आराम मिळवण्यासाठी या तेलाने मालिश करावी. मालिश केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांमधील वेदना कमी होतात.
खोबऱ्याच्या तेलाने मालिश केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, स्नायू मोकळे होतात आणि त्वचेला भरपूर पोषण मिळते. रात्रीच्या वेळी चांगली झोप येण्यासाठी शरीराच्या सर्वच अवयवांना मालिश केल्यास गाढ झोप लागेल आणि शरीरातील थकवा कमी होईल. मानसिक तणाव वाढल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. खोबरेल तेलाचा मालिश केल्यामुळे एकदम रिलॅक्स वाटते. दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला आरामाची आवश्यकता असते. अशावेळी झोपण्याआधी खोबरेल तेलाने मालिश करावी.
महिलांच्या आरोग्यासाठी काही ठराविक तेल अतिशय प्रभावी ठरतात. तिळाच्या तेलाने मालिश केल्यास हाडांना आलेली सूज किंवा हाडांच्या वेदनांपासून आराम मिळेल. यासाठी वाटीमध्ये खोबरेल तेल आणि तिळाचे तेल एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले तेल कोमट गरम झाल्यानंतर हाडांवर मालिश करावी. महिनाभर नियमित तेलाने मालिश केल्यास त्वचेला मृदुता आणि तजेलता येते. मालिश करण्यासाठी तुम्ही बदाम तेलाचा सुद्धा वापर करू शकता. बदाम तेल त्वचेवर लावल्यास त्वचेवरील रक्तभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. थंडीच्या दिवसांमध्ये स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा. मोहरीचे तेल जास्त घट्ट असल्यामुळे त्यात थोडस खोबरेल तेल मिक्स करून मगच शरीराला लावावे.
Ans: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे (जरी तहान कमी लागली तरी), नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे.
Ans: हिवाळ्याच्या काळात शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, जसे की सुकामेवा, गूळ, आणि हंगामी फळे व भाज्या.






