मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
नागपूर: स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांची कला बघण्याची संधी देणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या महोत्सवाच्या संकल्पनेबद्दल त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांची लाइव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
🔸CM Devendra Fadnavis at 'Khasdar Sanskrutik Mahotsav 2025'.
Union Minister Nitin Gadkari, MoS Adv. Ashish Jaiswal, MLA Pravin Datke and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी केंद्रीय… pic.twitter.com/qO40ofEHR7 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 8, 2025
एक लाख क्षमतेचे स्टेडियम व्हावे: नितीन गडकरी
कार्यक्रमांना नागपूरकरांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद हीच या महोत्सवाच्या यशाची पावती आहे. पण जागेअभावी बऱ्याच लोकांना महोत्सवातील कार्यक्रमाचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे भविष्यात एक लाख क्षमता असलेले स्टेडियम नागपुरात तयार व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सकाळच्या सत्रात झालेल्या गीता पठणाच्या तीन विश्वविक्रमांबद्दल त्यांनी शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बाळ कुलकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.






