तुळशीच्या लग्नानंतर सगळीकडे लग्नाच्या मुहूर्ताना सुरुवात होणार आहे. स्वतःच्या लग्नात कितीही तयारी केली तरीसुद्धा ती कमीच असते. लग्नात कोणत्या रंगाची साडी नेसावी, कसा मेकअप करावा असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. लग्नामध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मुली नवनवीन डिझाईन्सच्या साड्या किंवा ड्रेस शोधत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नवरीचे काही सुंदर लुक्स बदल सांगणार आहोत. हे लुक्स तुम्हालासुद्धा खूप आवडतील.(फोटो सौजन्य-istock)
सुंदर साड्या आणि मेकअप लुक
लग्न लागताना प्रामुख्याने अनेक ठिकाणी नवरी पिवळ्या रंगाची साडी नेसते. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या लग्नात पिवळ्या रंगाची साडीवर हिरवा, लाल, गुलाबी, जांभळा काठ असलेली साडी नेसू शकता.
तुम्हाला लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसायची नसेल तर तुम्ही जांभळ्या रंगाची सुंदर पैठणी किंवा कांजीवरम साडी नेसू शकता. या साड्या मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंगला आहेत.
बदलत्या फॅशनप्रमाणे हल्ली शिफॉन किंवा ऑरगेंझा फॅब्रिकमध्ये तुम्ही लग्नाची साडी घेऊ शकता. ही साडी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये नेसता येते. साडीला लुक रॉयल लुक येतो.
पैठणी साडी सर्वच महिला आणि मुलींना आवडते. अनेक मुली लग्नाच्या दिवशी पिवळ्या किंवा इतर रंगाची पैठणी नेसताना. पैठणी साडीवर कोणतेही दागिने उठूनच दिसतात.
लग्नामध्ये तर तुम्हाला मराठमोळा आणि पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची हेवी बॉर्डर असलेली साडी नेसू शकता. हिरव्या रंगाच्या साडीवर सोन्याचे दागिने अधिक सुंदर आणि उठावदार दिसतात.