उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंबे उपलब्ध असतात. हापूस आंब्याचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कोकणातील हापूस आंबे जगभरात फेमस आहेत. ताज्या रसाळ आंब्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. नेहमीच आंब्याची काप घेऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही आंब्यांपासून हे चविष्ट पदार्थ बनवू शकता. एकापेक्षा एक भारी पदार्थ पाहून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. (फोटो सौजन्य – istock)
ताज्या रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा 'हे' चविष्ट पदार्थ, एकापेक्षा एक भारी पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

पिकलेल्या हापूस आंब्यांचा वापर करून केवळ भारतीय पदार्थांचं नाहीतर विविध देशांमधील चविष्ट पदार्थ सुद्धा बनवू शकता.

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कोकणातील प्रत्येक घरात आंब्यांपासून रायता बनवला जातो. मोहरी आणि इतर मसाल्यांची फोडणी देऊन बनवलेला पदार्थ अतिशय चविष्ट लागतो.

हापूस आंब्यांपासून बनवला जाणारा अतिशय सोपा आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आमरस. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास आमरस पुरी बनवली जाते.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आईस्क्रीम खाल्ले जाते. पण विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरी आंब्याचे आईस्क्रीम बनवू शकता. यामुळे लहान मुलं खूप जास्त खुश होतील.

आंबा, काजू, दूध आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेला मँगो पुडिंग, मँगो लस्सी, आंब्याचे सरबत चवीला अतिशय सुंदर लागते. आंब्याचे मिल्कशेक प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते.






