ताज्या रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा 'हे' चविष्ट पदार्थ, एकापेक्षा एक भारी पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी
पिकलेल्या हापूस आंब्यांचा वापर करून केवळ भारतीय पदार्थांचं नाहीतर विविध देशांमधील चविष्ट पदार्थ सुद्धा बनवू शकता.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कोकणातील प्रत्येक घरात आंब्यांपासून रायता बनवला जातो. मोहरी आणि इतर मसाल्यांची फोडणी देऊन बनवलेला पदार्थ अतिशय चविष्ट लागतो.
हापूस आंब्यांपासून बनवला जाणारा अतिशय सोपा आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आमरस. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास आमरस पुरी बनवली जाते.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आईस्क्रीम खाल्ले जाते. पण विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरी आंब्याचे आईस्क्रीम बनवू शकता. यामुळे लहान मुलं खूप जास्त खुश होतील.
आंबा, काजू, दूध आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेला मँगो पुडिंग, मँगो लस्सी, आंब्याचे सरबत चवीला अतिशय सुंदर लागते. आंब्याचे मिल्कशेक प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते.