शरीरासाठी किवी अतिशय महत्वाची आहे. किवीमध्ये असलेले घटक शरीराला पोषण देतात. किवीमध्ये विटामिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा किवीचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला किवीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी सहज बनवता येतील असे काही सोपे पदार्थ सांगणार आहोत. हे पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. किवीच्या सेवनामुळे शरीरातील कमी झालेल्या पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी मदत करते. (फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये किवीपासून बनवा 'हे' चविष्ट आणि हेल्दी पदार्थ
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी किवी स्मूदी तुम्ही बनवू शकता. किवी, अर्धे केळे, थोडे दही आणि मध मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली स्मूदी नियमित प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
घरात कोणतेही साधे चिप्स किंवा वेफर्स खायला आणल्यानंतर तुम्ही त्यासोबतच किवी साल्सा सुद्धा बनवू शकता. किवी साल्सा बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागत. घाईगडबडीमध्ये किवी साल्सा झटपट तयार होईल.
लिंबाचा रस सगळ्यांचं प्यायला आवडतो. पण तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी किवी सरबत बनवू शकता. किवी सरबत पुदिन्याची पाने, काळे मीठ, भाजलेले जिरे आणि थोडे थंड पाणी आणि किवीचे तुकडे घालून सरबत बनवून घ्या.
सॅलड खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे तुम्ही किवी आणि स्ट्रॉबेरीपासून झटपट सॅलड बनवू शकता. सॅलड खाल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच काहींना काही थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही किवी पॉप्सिकल बनवू शकता. किवीचे बारीक बारीक तुकडे करून त्यात लिंबाचा रस आणि मध घालून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.