लग्न सोहळ्यातील सर्वच लहान मोठ्या विधींनी आणि परंपरांना खूप जास्त महत्व आहे. लग्नाच्या आधल्या दिवशी वधू वराला हळद लावली जाते. हळदी कार्यक्रमाशिवाय लग्नसोहळा अपूर्णच वाटतो. हळदीच्या दिवशी वधू वराला हळद लावली जाते. तसेच लग्नघरात देवब्राह्मण आणि मुहुर्ताचा सुद्धा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने पिवळ्या रंगाची साडी किंवा स्टायलिश लुक केला जातो. आज आम्ही तुम्हाला हळदी सोहळ्यातील लुक आणखीनच स्टायलिश आणि मॉर्डन करण्यासाठी या सोप्या आयडिया तुम्ही फॉलो करू शकता.या आयडिया फॉलो करून लुक केल्यास तुम्ही सुंदर दिसाल. (फोटो सौजन्य – pinterest)
हळदीचा लुक करा अधिक स्टायलिश आणि मॉडर्न

हळदी सोहळ्यात तुम्ही पिवळ्या रंगाचा लेहेंगा सुद्धा घालू शकता. पिवळ्या रंगाचा लेहेंगा आणि त्यावर लाईट मेकअप केल्यास लुक अतिशय सुंदर दिसेल.

काहींना हळदी सोहळ्यात अतिशय युनिक लुक हवा असतो. अशावेळी तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसून त्यावर बारीक कळ्या असलेल्या फुलांचे दागिने घालू शकता.

पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करू शकता. गुलाबी, लाल, हिरवा, जांभळा इत्यादी कोणत्याही रंगाचा ब्लाऊज उठावदार दिसेल.

हळदीचा लुक आणखीनच सुंदर करण्यासाठी तुम्ही ड्रेस किंवा शरारा सुद्धा घालू शकता. पिवळ्या रंगाच्या ड्रेसवर पांढऱ्या फुलांचे किंवा इतर कोणत्याही रंगाचे दागिने अतिशय सुंदर दिसतात.

पिवळी साडी विथ जॅकेट किंवा रेडीमेड साडी हळदी सोहळ्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. रेडिमेड साडी नेसण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.






