१२ वर्षांतून एकदा प्रयागराज येथे कुंभमेळा होतो. तर १४४ वर्षांतून एकदा महाकुंभ होतो. जगभरातून लाखो भाविक या महाकुंभमध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. या कुंभमेळ्यात अगदी सामान्यांपासून देशातील महत्वाचे राजकीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही या महाकुंभात सहभाग होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कुवरही महाकुंभात सहभागी झाली होती. दोघांनीही या महाकुंभमध्ये शाही स्नान केले. अभिनेत्याने महाकुंभातील फोटो शेअर केले आहेत.
Milind Soman Visits Maha Kumbh With Wife
मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कुंवरने मौनी अमावस्येच्या महाकुंभात श्रद्धेने स्नान केले आहे, ज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मिलिंदने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो पिवळ्या रंगाचे धोतर घातलेला आणि गळ्यात रुद्राक्ष धारण केलेला दिसत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये, मिलिंद आणि त्याच्या पत्नीने महाकुंभात श्रद्धेने स्नान केले. मिलिंदने पत्नीसोबत सूर्यदेवाला पाणी अर्पण केले. एवढेच नाही तर हे दोघेही सर्वसामान्यांमध्ये महाकुंभमेळ्याचा आनंद लुटताना दिसले. मिलिंद आणि अंकिताच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
महाकुंभाचे हे फोटो शेअर करताना मिलिंदने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - "मौनी अमावस्येच्या खास दिवशी अंकिता कुंवरसोबत महाकुंभला येऊन धन्य झालो! असे अध्यात्मिक स्थान आणि अनुभव मला आठवण करून देतात की मी किती लहान आणि क्षुल्लक अस्तित्वाच्या विशालतेत आहे आणि आपला प्रत्येक क्षण किती खास आहे."
दरम्यान, महाकुंभात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीबद्दलही मिलिंदने दुःख व्यक्त केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "काल रात्रीच्या घटनेने मी दु:खी झालो आहे आणि ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझी प्रार्थना आहे. हर हर गंगे! सर्वत्र शिव."
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सही प्रयागराजला पोहोचले आहेत. आत्तापर्यंत भाग्यश्री, रेमो डिसूझा, हेमा मालिनी, प्रियांका चोप्रा, अनुपम खेर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभला पोहोचून संगममध्ये श्रद्धेने स्नान केले आहे.