वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वाराणसी केवळ पर्यटकांच्या मनोरंजानासाठी किंवा दर्शनासाठी नव्हे, तर येथील महादेवांच्या वेशभूषेत फिरणाऱ्या लहान मुलांसाठी देखील प्रसिद्ध आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन मुले महादेवाच्या वेशात असून एकमेकांशी भांडण करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये ६० रुपयांवरुन वाद सुरु आहे. व्हायरल व्हिडिओनुसार, एक मुलाने दुसऱ्या मुलाकडून ६० रुपये घेतले होते. परंतु त्याने ते परत दिले नसल्याने त्यांच्यात हा वाद सुरु आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, भस्म फासूनलेले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, गॉगल या चिमुकल्यांनी घातलेला आहे. ६० रुपये मिळवण्यासाठी एकजण दुसऱ्यावर चढला आहे. सध्या या मजेशीर वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
बनारस में दो महादेव आपस में भीड़ गए 😂 बड़े महादेव ने छोटे महादेव के 60 रुपए लिए थे लेकिन अभी तक लौटाए नहीं🥲 pic.twitter.com/z1W8HXaw5q — Nitin Prajapati (@Prajapat204) February 15, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Prajapat204 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने आज नशी केला नाही? असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एकाने हा हा हा मुले देवाघरची फुले असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने हे आश्चर्यकारक आहे, कलियुगात दोन महादेव आहेत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजीही शेअर केले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






