पेरू हे आरोग्यासाठी फायदेशीर आणि आरोग्यदायी फळ आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने ते ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पेरु खाताना मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या चुका करू नये जाणून घ्या
पेरू खाताना मधुमेहाच्या रुग्णांनी करू नका या चुका

पिकलेले पेरू सोलू नका: मधुमेहाचे रुग्ण अनेकदा पिकलेले पेरू न सोलताच खातात. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, कारण कच्च्या पेरूच्या तुलनेत पिकलेल्या पेरूच्या सालीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते.

पेरूला चिकटलेली पाने टाकून द्या मधुमेहाच्या रुग्णांनी पेरुला चिकटलेली पाने टाकून देऊ नका. अनेक अभ्यासांनुसार, दिवसातून दोनदा दहा ते बारा पेरूच्या पानांपासून बनवलेला चहा प्यायल्याने उपाशीपोटीची आणि जेवणानंतरची साखर दोन्ही झपाट्याने नियंत्रणात येऊ शकते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते : पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कमकुवत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

हृदयाचे आरोग्य: पेरूमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

त्वचा आणि केस: पेरूमध्ये असलेले विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या, मुरुमे आणि पुरळ कमी करून त्वचेला चमक आणतात.






