विराट कोहलीची एक्स गर्लफ्रेंड इसाबेल लीटचे फोटो सध्या चर्चेत आहेत. इसाबेलने दोन वर्षे विराटला डेट केले. इजाबेल ने सिक्सटीन, पुराणी जीन्स सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती कतारमध्ये राहते आहे. तुम्ही अनेक अभिनेत्रींच्या प्रेमकथांबद्दल वाचले असेलच. पण एक अभिनेत्री अशी आहे जिच्याशी विराट कोहली दोन वर्षे डेट करत होता. अनुष्का शर्माच्या आधी त्याने या अभिनेत्रीला डेट केले होते. या अभिनेत्रीने अनेक सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे. आज यांच्या नात्याबद्दल जाणून घेणार आहोत.
अनुष्का नाही तर, या अभिनेत्रीला विराट कोहलीने दिले होते आपले हृदय; २ वर्ष डेटिंगनंतर झाला ब्रेकअप (फोटो सौजन्य - x अकाउंट)
अलिकडेच विराट कोहलीचे त्याची एक्स गर्लफ्रेंड इसाबेल लीटसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यानंतर ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली. इसाबेल लीट आणि विराटने एकमेकांना २ वर्ष डेट केले पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
विराट कोहलीने या नात्याबद्दल कधीही प्रतिक्रिया दिली नाही, तरी इसाबेल लीटने एकदा एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. २०१४ मध्ये बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते की जेव्हा ती भारतात आली तेव्हा विराट कोहली तिचा पहिला भारतीय मित्र बनला.
एवढेच नाही तर या मुलाखतीत इसाबेल लाइटनेही हे नाते स्वीकारले. ती म्हणाली, 'हो, आम्ही गुप्तपणे डेट करत होतो. आम्ही दोन वर्षे एकत्र होतो. आम्हाला हे नाते सार्वजनिक करायचे नव्हते.'
इसाबेल लाइटच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने 'सिक्सटीन', 'पुरानी जीन्स', 'मिस्टर मजनू' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नाही तर तिने आमिर खानसोबत 'तलाश' चित्रपटातही काम केले आहे.
इसाबेल लीट ही एक ब्राझिलियन अभिनेत्री आहे. तिने भारतीय इंडस्ट्रीतही नशीब आजमावले पण ती मोठी उंची गाठू शकली नाही आणि ती शेवटची २०२० मध्ये विजय देवरकोंडासोबत 'वर्ल्ड फेमस लवर' चित्रपटामध्ये दिसली.