दैनंदिन आहारात कायमच विविध फळांचे सेवन केले जाते. फळांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याची जास्त काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे पोट किंवा त्वचा रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी पपईचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पपई शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, कॅरोटीन, विटामिन ई, ए आणि इतर अनेक खनिजे मुबलक प्रमाणात आढळून येतात. पण काहींच्या आरोग्यासाठी पपई अतिशय घातक ठरते. पपईचे सेवन केल्यामुळे शरीरसंबंधित आजारांची लागण होते. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपईचे सेवन करू नये. (फोटो सौजन्य – istock)
'या' आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी पपई ठरते अतिशय घातक, खाल्ल्यास शरीरावर होतील गंभीर परिणाम

कावीळ किंवा दम्यासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात पपईचे अजिबात सेवन करू नये. यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. यामध्ये असलेले पॅपेनसारखे एन्झाइम्स आणि बीटा-कॅरोटीनसारखी संयुगे शरीराचे नुकसान करतात.

मूत्रपिंडाचा आजार असलेल्या किंवा मुतखड्याचा समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी पपई खाणे टाळावे. यामध्ये असलेल्या अतिरिक्त ऑक्झॅलेटमुळे पोटात मुखड्याची वाढ होते.

उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असलेल्या लोकांनी पपईचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. जास्त सेवन केल्यास उच्च रक्तदाबाची वाढू शकते.

पपई खाल्ल्यानंतर काहींच्या शरीरावर ॲलर्जी, खाज किंवा पुरळ येऊ शकते. त्यामुळे अशांनी पपई खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे, अन्यथा ॲलर्जी वाढू शकते.

पपई शरीरासाठी खूप जास्त गरम असते. त्यामुळे पपईचे सेवन मर्यादित करावे. जास्त पपई खाल्ल्यास मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त त्रास होऊ शकतो.






