भारतचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. आजपासून म्हणजेच २७ जुलैपासून भारताचे खेळाडू ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. भारताचे खेळाडू २६ जुलै रोजी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी भारतीय दलाचे नेतृत्व भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिकमध्ये दोनदा पदक विजेती पीव्ही सिंधू आणि भारतीय टेबल टेनिस दिग्गज शरथ कमल हे टीम इंडियाचे ध्वजवाहक होते. भारतीय खेळाडूंच्या या उद्घाटन सोहळ्याच्या काही खास क्षणांवर एकदा नजर टाका.
फोटो सौजन्य - olympickhel
भारतीय खेळाडूंची आज २७ जुलै रोजी पॅरिस मोहीम सुरू होणार आहे, यापूर्वी भारताचे खेळाडू विशेष वेशभूषेत पाहायला मिळाले.
भारताचे स्टार पीव्ही सिंधू आणि शरथ कमल यांनी भारतीय दलाचे नेतृत्व केले आणि ध्वजवाहकाची जबाबदारी पार पाडली.
भारताची स्टार बॅडमिंटनपटूची तुकडी एका फ्रेममध्ये पाहायला मिळाली. यामध्ये लक्ष्य सेन, चिराग शेट्टी, सात्विकसाइराज, पीव्ही सिंधू, अश्विनी पोण्णप्पा, तनिषा क्रास्टो आणि एचएस प्रणॅाय हे एका फोटोमध्ये दिसले.
सीन नदीवरून पार करतानाचे अनेक फोटो भारतीय परिसमधील खेळाडूंचे व्हायरल होत आहेत, यामध्ये भारतीय संघाच्या सर्वांच्या हातामध्ये तिरंगा दिसत आहे.
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि काही खेळाडू भारतीय बॅडमिंटन मेथोइ बोइ यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यंदा भारताचे सहा बॉक्सर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत, यामध्ये चार महिला आणि २ पुरुषांचा सहभाग आहे. निशांत देव, निखत झरीन, लोव्हलीना, प्रीती पवार, जास्मिन, अमित पांघल या खेळाडू एका फोटोमध्ये दिसले.