आज पॅरिस ऑलिम्पिकच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळा होणार आहे. यासाठी पॅरिसमध्ये बऱ्याच महिन्यांपासून तयारी सुरु आहे. भारताचे ११७ खेळाडूंना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. खरं सांगायचं झालं तर भारताच्या तिरंदाजानी २५ जुलै रोजी पॅरिसचा श्रीगणेशा केला आहे. यंदाचा हा उद्घाटन सोहळा खास असणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. त्याचबरोबर अनेक मोठे आंतरराष्ट्रीय स्टार सिंगर, स्टार खेळाडू या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आज आपण पॅरिसमध्ये झालेल्या या तयारीवर एक नजर टाकणार आहोत.
पॅरिस ऑलिम्पिकचा हा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरु होणार आहे. फोटो सौजन्य - X अकाउंट
हा पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा स्टेडियमवर न होता, सीन नदीवर आयोजित करण्यात आला आहे.
भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये अनेक तिरंदाजानी २५ जुलै रोजी दमदार सुरुवात करून इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे.
६ किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची वाईट घटना घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
भारताच्या खेळाडूंकडून यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदकांची अपेक्षा आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ७ पदके जिंकली होती.
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात मोठे कलाकार उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर एक प्रकारे २६ जुलै रोजी उत्सव साजरा केला जाणार आहे.