जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. या कालावधीमध्ये तुकाराम महाराजांनी १३ दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज १३ दिवस ज्या शिळेवर उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती.
त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाची इच्छा होती.
आधीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची ४२ इंच मूर्ती आहे.
मंदिरावर ३६ कळस स्थापन करण्यात आले आहेत.
संत तुकाराम महाराजांची काळ्या दगडाची मूर्ती ४२ दिवसांमध्ये उभारण्यात आली आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे यांनी तयार केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूमध्ये आलेले भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
सर्वोदय भारत शिल्पकला कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे मंदिर उभारणीचं काम देण्यात आलं होतं. मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे.