पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.30) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये भेट दिली आहे. तब्बल 11 वर्षानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. तसेच दिशाभूमीची देखील भेट घेतली आहे. नुकतीच नागपूरमध्ये दंगल झाली होती. त्यानंतर पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
PM Narendra Modi visits Nagpur In RSS Sangh headquarters Reshimbagh and Dishabhoomi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. त्याचबरोबर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिशाभूमीला देखील भेट दिली आहे. बौद्ध भिक्षुकांसह मोदी यांनी अभिवादन केले.
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या स्मारकाला पुष्पांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षानंतर रेशीमबागला भेट दिली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे.
यावेळी मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याचे मनभरुन कौतुक केले आहे.