Reshma Shinde Mehendi: रेश्मा शिंदेने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. नुकतेच तिने केळवणीपासून अनेक फोटो शेअर केले आहेत आणि आज तिच्या घरातच मेहंदीचा कार्यक्रमही झाला. या सगळ्यात नक्की रेश्मा कोणाशी लग्न करतेय हे गुलदस्त्याच आहे. तर अनेक ठिकाणी शोबाजी असतानाही रेश्माचे साधे आणि सोबर लुक हे लक्ष वेधून घेत आहेत. अत्यंत सुंदर आणि तितकेच लाघवी असे रेश्माच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत आणि तिचे चाहते तर आता खूपच उत्सुक झाले आहेत. पहा रेश्माच्या मेहंदी सोहळ्याचे खास फोटो (फोटो सौजन्य - Instagram)
रेश्मा शिंदेने मालिकेत आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा प्रेक्षकांचं मन जिंकून घेत असून खऱ्या आयुष्यात लग्नासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच तिने मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत
रेश्माने कोणतीही शोबाजी न करता अत्यंत साधा आणि सोबर लुक मेहंदीसाठी केलाय. पारंपरिक पद्धतीने तिने हा सोहळा आयोजित केला असून घरचे आणि मित्रमैत्रिणी असा गोतावळा दिसून येतोय. मेहंदीचा लुक खूपच सुंदर दिसतोय
मेहंदी रंगाच्या पारंपरिक महाराष्ट्रीय ड्रेसमध्ये रेश्मा खूपच सुंदर दिसतेय तर अगदी भक्तीपूर्ण असे डेकोरेशनही तिच्या घरी करण्यात आले आहे. रेश्माने आपला लुक अत्यंत साधा पण तितकाच आकर्षक ठेवलाय
या ड्रेससह रेश्माने कुंदन आणि गोल्डन दागिन्यांचा वापर केला असून केवळ गळ्यात नेकलेस आणि कानात लहानसे कानातले घालत हा लुक पूर्ण केलाय. कुठेही अतिशयोक्ती नाही. कुटुंबासह मजा मस्ती करत ती मेहंदीचा आनंद घेताना दिसून येत आहे
कुटुंबासह अनेक फोटो रेश्माने शेअर केले असून तिच्या चेहऱ्यावरील आनंदच सर्व काही सांगून जात आहे. सध्या डेस्टिनेशन वेडिंग अथवा अन्य ट्रेंड चालू असताना रेश्माचा हा साधेपणा तिच्या चाहत्यांना नक्कीच भावला आहे
रेश्माचा हा लुक जितका साधा तितकाच अधिक आकर्षक असल्याचे दिसून येत आहे आणि तिने अगदी सर्व परंपरा जपत आधुनिकता आणि पारंपरिकतेचा योग्य मेळ घातल्याचेही या फोटोंवरून दिसून येत आहे. मात्र आता सर्वांनाच तिच्या नवऱ्याला पहायची उत्सुकता आहे हे नक्की. पहिल्यांदाच तिने त्याच्या हाताचा फोटो शेअर करत चाहत्यांना झलक दाखवली आहे