साडी म्हणजे सर्वच महिलांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. सणवार, पूजा किंवा घरातील प्रत्येक कार्यक्रमासाठी आवर्जून साडी नेसली जाते. साडीमुळे महिलांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. जीन्स, कुर्ता, स्कर्ट इत्यादी आरामदायक कपडे घातल्यानंतर सुद्धा सणावरांतच्या दिवसांमध्ये साडीच नेसली जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्रॅब्रिकच्या साड्या उपलब्ध आहेत. पण बऱ्याचदा साडी खरेदी केल्यानंतर त्यावर कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावा, दागिने कोणते घालावेत, हेअरस्टाईल कोणती करावी? असे अनेक प्रश्न कायमच पडतात. त्यामुळे या सोप्या टिप्स फाॅलो करून तुम्ही साडीवरील लुक आणखीनच उठावदार करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
साडी नेसताना पदरापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची! आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

साडीवर खूप हेवी वर्क असेल तर साडीचा ब्लाऊज अतिशय कमी वर्क असलेली शिवून घ्यावा. ब्लाऊज जास्त हेवी केल्यास साडीवरील लुक खूप विचित्र दिसेल.

साडीचा रंग चमकदार आणि गडद असल्यास नेहमी कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाऊजची निवड करावी. यामुळे साडी आणि ब्लाऊजचा लुक हटके दिसेल. कायमच त्वचेच्या रंगानुसार साडीची निवड करावी.

साडी अगदी नाजूक काठांची आणि नाजुक बुटीची असेल तर त्यावर प्लेन ब्लाऊज, मोठे कानातले, गळ्यात हेवी नेकलेस घातल्यास साडी आकर्षक दिसेल.

साडीवर खूप हेवी वर्क नको असल्यास त्यावरील ब्लाऊज हेवी करून बनवावा. यामुळे साडीचा लुक जास्त हेवी दिसणार नाही आणि चारचौघांमध्ये उठवदार दिसाल.

लठ्ठ आणि ठेंगण्या महिलांनी मोठे काठ असलेल्या साड्यांची निवड करणे टाळावे. साडीवरील दागिने आणि टिकली साडीच्या काठानुसार निवडावी.






