गणपती बाप्पाच्या विसर्जनला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. बाप्पा आल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. बाप्पाचे आगमन जलौषात आणि मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. त्याच उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देखील दिला जातो. यादिवशी नृत्य, गाणी आणि फिरत्या मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात नेमका कसा लुक करावा? असे अनेक प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही या डिझाईनच्या साड्या नेसू शकता. यामध्ये तुम्ही अतिशय सुंदर दिसाल. (फोटो सौजन्य: Pinterest)
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सुंदर दिसण्यासाठी नेसा 'या' सुंदर प्रकारच्या साड्या
सणावाराच्या दिवसांमध्ये बनारसी साडी अतिशय आवडीने नेसली जाते. या साडीवरील लुक अतिशय रॉयल आणि स्टायलिश दिसतो. त्यामुळे तुम्ही लाल, हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची बनारसी साडी नेसू शकता.
विसर्जनाच्या वेळी तुम्हाला जर अतिशय हलकी साडी नेसायची असेल तर तुम्ही जरी वर्क साडी नेसू शकता. या साडीच्या काठाला अतिशय नाजूक वर्क केलेले असते.
शिफॉन साड्या नेसायला खूप आरामदायी असते.या साडीवर प्रिंट्स, भरतकाम आणि दगडी काम केलेले असते. शिफॉन साडीवर तुम्ही मोत्याचे सुंदर दागिने स्टाईल करू शकता.
गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात तुम्हाला जर ट्रेडीशन लुक करायचा असेल तर तुम्ही गढवाल सिल्क साडी नेसू शकता. या पद्धतीची साडी नेसू त्यावर सोन्याचे दागिने परिधान केल्यास अतिशय क्लासी लुक दिसेल.
हल्ली सोशल मीडियावर इरकल साडीची मोठी क्रेझ आहे. इरकल साडीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही खण किंवा कॉटनची साडी सुद्धा नेसू शकता.