Shardiya Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपल्या आजूबाजूला अशा काही बायका असतात ज्या आपल्याला जगायची नवी उमेद देतात. सोनाली नाडकर ही त्यातलीच एक आहे. तिची कहाणी ऐकली की खरच अंगावर काटा येतो.लहानपणापासूनच सोनालीला केसांची समस्या होती. तिला अलोपेशिया नावाचा आजार झाला होता. या आजारामुळे केस गळून जातात आणि परत येत नाहीत. शाळेत असतानापासूनच तिचे सगळे केस गेले होते. किती तरी औषधे केली, डॉक्टर केले, हेअर ट्रान्सप्लांटचा पण विचार केला, पण काहीच उपयोग झाला नाही. एकही उपाय कामी आला नाही.
विचार करा, शाळेत जाणारी एक लहान मुलगी आणि तिच्या डोक्यावर एक पण केस नाही. तिला किती त्रास झाला असेल. शाळेत तिची मित्रमैत्रिणी तिला चिडवायची. कोणी म्हणायचे हिला कॅन्सर झाला आहे म्हणून टक्कल पडले आहे. ते शब्द किती लागले असतील तिला. पण सोनाली रडत बसली नाही. तिने त्या सगळ्याचा धीराने सामना केला.स्वतःला जसे आहे तसे स्वीकारलेशेवटी एक दिवस सोनालीने ठरवले की आता रडायचे नाही. जसे आहे तसे स्वीकारायचे. केस नाहीत तर नाहीत, पण यामुळे मी माझे आयुष्य थांबवणार नाही.
तिने हेच सत्य स्वीकारले आणि पुढे चालायला सुरुवात केली.आज लोक तिला प्रेमाने "बाल्ड गर्ल" म्हणतात. म्हणजे टक्कल असलेली मुलगी. तिने या नावालाच आपली ओळख बनवले आहे. ज्या गोष्टीची तिला लाज वाटायची, त्याच गोष्टीला तिने आपली ताकद बनवले.
आता कोणाची भीती तिला वाटत नाही. अनेक मुलींसाठी प्रेरणा बनलीसोनाली फक्त स्वतःसाठी जगली नाही. तिच्यासारख्या ज्या दुसऱ्या मुली आहेत, ज्यांना केसांची समस्या आहे, त्यांना ती मदत करते. त्यांच्याशी बोलते, त्यांना धीर देते.
अनेक मुली तिला मेसेज करतात की ताई, आम्हाला पण हाच प्रॉब्लेम आहे, आम्हाला बाहेर जायची लाज वाटते. तेव्हा सोनाली त्यांना समजावते की सुंदरता केसात नसते. सुंदरता आपल्या मनात असते, आपल्या कामात असते. तिचे हे बोलणे ऐकून कित्येक मुलींना नवी हिंमत मिळाली आहे.
सोनालीने काही सिनेमांमध्ये काम पण केले आहे. आणि 'घरत गणपती' या गाजलेल्या सिनेमासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम बघितले होते. म्हणजे ती अभिनेत्री तर आहेच, पण त्यासोबत एक हुशार टेक्निशियन पण आहे.खरी सुंदरता कशात असते?आपण नेहमी म्हणतो की सुंदर दिसण्यासाठी केस असले पाहिजेत, गोरेपान असले पाहिजे. पण सोनालीने हे सगळे खोटे पाडले आहे.
तिने दाखवून दिले की खरे सौंदर्य हे दिसण्यात नसते, तर ते बघण्याच्या दृष्टीत असते.केस नसले तरी एक मुलगी आत्मविश्वासाने जगू शकते, काम करू शकते, आणि दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनू शकते, हे सोनालीने सिद्ध केले आहे.आज सोशल मीडियावर तिचे खूप फॉलोअर्स आहेत. लोक तिच्या धाडसाचे कौतुक करतात. तिची गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात काही कमी असेल तर रडत बसू नका. जे आहे त्यात आनंद माना आणि पुढे जा. कारण तुमची कमजोरीच एक दिवस तुमची सगळ्यात मोठी ताकद बनू शकते.