Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sudan News : मृत्यूचे तांडव सुदानमध्ये खाणकाम करणाऱ्यांवर इजिप्तचा हवाई हल्ला ;१६० हून अधिक जणांचा मृत्यू

Sudan News : सुदान-इजिप्त सीमावर्ती भागातील सोन्याच्या खाणींवर झालेल्या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सुदानमधील मानवाधिकार संघटनांनी या हल्ल्यासाठी इजिप्तच्या हवाई दलाला जबाबदार धरले आहे. मृतांचा आकडा ७२ ते २०० पर्यंत सांगितला जात असला, तरी त्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 12, 2026 | 05:33 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • हल्ल्यात मृतांचा आकडा ७२ ते २०० पर्यंत ;नेमकी संख्या अस्पष्ट
  • सुदानमधील युद्धामुळे नागरिकांचे जगणे कठीण
  • इजिप्तने हल्ला का केला
Sudan News : सुदानमधील संघर्षाने आता आणखी भीषण वळण घेतले आहे. खाणकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप असलेल्या हवाई हल्ल्यानंतर परिसरातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. या हल्ल्यात १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळावर मृतदेह, उद्ध्वस्त वाहने आणि जळालेल्या वस्तूंचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हल्ल्यात मृतांचा आकडा ७२ ते २०० पर्यंत ;नेमकी संख्या अस्पष्ट

या भीषण हल्ल्यामुळे मृतांच्या संख्येवर वेगवेगळे दावे समोर येत आहेत . सुदानमधील मानवाधिकार संघटना इमर्जन्सी लॉयर्स ने सुरवातीला किमान ७२ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे . तर सुदान ट्रिब्यूनच्या बातमीनुसार घटनास्थळावरील बचावलेल्या कामगारांनी मृतांचा आकडा २०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले आहे .

सुदान डॉक्टर्स नेटवर्कने सुरवातीला १३ मृत्यू आणि २८ जखमींची माहिती दिली होती . त्यामुळे १६० हून अधिक मृत्यूंच्या वृत्ताची स्वतंत्रपणे खात्री झालेली नाही . दुर्गम भाग आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे बचावकार्य तसेच मृतांची निश्चित संख्या समोर आणण्यात अडचणी येत आहेत .

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

सुदानमधील युद्धामुळे नागरिकांचे जगणे कठीण

सुदानमध्ये एप्रिल २०२३ पासून लष्कर आणि निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्सेस ( RSF ) यांच्यात संघर्ष सुरु आहे . या युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून , लोकांमध्ये गरिबीचे प्रमाण वाढत चालले आहे . लाखो नागरिकांना रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत आहे . सोन्याच्या खाणकामातून मिळणारे उत्पन्न हा अनेकांसाठी जगण्याचा आधार बनला आहे .

मात्र सोन्याच्या व्यापारावरून तणाव आणि संघर्ष वाढत असल्याचे चित्र आहे . ताज्या हवाई हल्ल्यामुळे सीमावर्ती भागात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . युद्धात भरडल्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना आता कामधंद्याच्या ठिकाणीही आपला जीव गमवावा लागत आहे . या सगळ्या प्रकाराबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त होत असली तरी यावर ठोस उपाय काढण्याचे पाऊल पडताना सध्या तरी दिसत नाही . ज्याच्याकडे पैसा आहे पॉवर आहे तेच लोकं आपल्या सुरक्षिततेची आणि चांगल्या जीवनाची सैर करत आहेत .

Pakistan civil war: 40,000 पंजाब पोलिस लढणार इम्रान खानच्या बाजूने; पाकिस्तानात मुनीर अन् शहबाज सरकारच्या सत्तेला लागणार सुरुंग?

इजिप्तने हल्ला का केला

हल्ला झालेला भाग हा इजिप्त आणि सुदान यांच्यातील वादग्रस्त सीमावर्ती प्रदेशाजवळ आहे . खासकरून हालाईब त्रिकोणावर दोन्ही देश दावा करतात . त्यामुळे या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याचाही मुद्दा यांच्यातील भांडणाचे कारण आहे . इजिप्तने जून २०२६ मध्येही याच परिसरात बेकायदेशीर खाणकाम आणि तस्करीविरोधात लष्करी कारवाई केली होती .

त्यावेळी २२३ जणांना ताब्यात घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते .तसेच सुदान आणि इजिप्तच्या सीमावर्ती भागात सोन्याचे खूप मोठे साठे आहेत . परवानगीशिवाय हजारो कामगार या भागात खाणकाम करत असल्याचा इजिप्तचा आक्षेप आहे .म्हणजेच हा केवळ हवाई हल्ल्याचा विषय नाही तर सोन्याचे साठे , तस्करी आणि सीमावर्ती भूभागाचे नियंत्रण यांचा गुंतागुंतीचा संघर्ष आहे .

Web Title: Sudan news deadly carnageegyptian airstrike on miners in sudan over 160 killedcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Egypt news
  • gold mines
  • Marathi Breaking news
  • Marathi News
  • sudan crisis

संबंधित बातम्या

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला
1

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
2

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
3

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज
4

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.