भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करून विश्वविजेता झाला. या स्पर्धेमध्ये भारताचा संघ अपराजित राहील आणि त्याने एकही सामना न गमावता वर्ल्डकप भारताच्या नावावर केला. या अंतिम सामन्यांमध्ये भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने दमदार अर्धशतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत उभे केले. तर भारताच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. यामध्ये अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंड्याने मोलाची कामगिरी केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर मैदानावर अनेक भावना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या क्षणांवर एकदा नजर टाकूया.
फोटो सौजन्य - BCCI/ ICC
भारताचा किंग कोहलीने त्याच्या करियरचा शेवटचा T-२० सामना खेळून या फॉरमॅटला अलविदा केलं आहे. अंतिम सामन्यांमध्ये त्याने महत्वाची खेळी खेळली.
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता. ज्यावेळी भारताच्या संघाने विजय मिळवला तेव्हा त्यांच्या मिक्स भावना समोर आल्या.
भारताचा कॅप्टन रोहित शर्माने या विश्वचषकामध्ये त्याचबरोबर भारतीय क्रिकेटला वेगळ्या स्तरावर नेले आहे. हिटमॅनने सुद्धा त्याचा शेवटचा T-२० सामना होता अशी घोषणा केली आहे.
भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. फायनलच्या सामन्यातही त्याने महत्वाची भूमिका बजावून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून त्याचे अश्रू अनावर झाले.
सामन्यातील गेमचेंजर सूर्यकुमार यादवच्या कॅच कोणी कस काय विसरू शकतो. डेव्हिड मिलरने बाउंड्री बाहेर मारलेला हा षटकार सूर्याने झेल घेऊन गेम भारताकडे वळवला.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सामन्यामध्ये दमदार खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर तो त्याच्या लेकासोबत मैदानात दिसला.