भारताच्या प्रत्येक शहरात असं काही खास आहे, जे लोकांना त्या ठिकाणी येण्यास भाग पाडतं. अशातच आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका शहराची माहिती सांगत आहोत जिथे लोकांना आपला मृत्यू हवा असतो. लोकांचा असा विश्वास आहे की, इथे मेल्यावर व्यक्तीच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो. हे ठिकाण म्हणजे बनारस. बनारसमधील काशी हे ठिकाण मोक्षाप्राप्तीसाठी फार फेमस आहे. असे मानले जाते की, हे ठिकाण भगवान शिवाच्या त्रिशूळावर विराजमान आहे आणि भैरव हा त्याचा कोतवाल आहे. इथे असंख्य मंदिरं आहेत आणि लोकांचा असा विश्वास आहे की, या ठिकाणी मृत्यू झाल्यास व्यक्तीची जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते.
भारतातील ते शहर जिथे दूरदूरवरून लोक येतात 'मरण्यासाठी'; अशी काय आहे या जागेची जादू की प्रत्येकाला इथे सोडावेसे वाटतात आपले प्राण
मुक्ती भवन हे काशीतील एक खास ठिकाण आहे, जिथे लोक फक्त शेवटचा श्वास घेण्यासाठी येतात. हे ठिकाण मृतांसाठी बनवण्यात आले आहे. लोक इथे येऊन जगाचा मोह सोडतात आणि भगवानाच्या भक्तीत तल्लीन होतात. ही इमारत हिंदू श्रद्धेचे प्रतीक मानले जाते.
मुक्ती भवनात राहण्यासाठी लोकांना मोफत सुविधा मिळते, यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाही. ज्यांच्या सांसारिक सुखांचा त्याग करुन आपल्या शेवटच्या क्षणात देवाचे स्मरण करायचे आहे ते लोक येथे येतात.
आतापर्यंत काशीच्या या मुक्ती भवनात १४,७०० हून अधिकांना मोक्ष मिळाला आहे. येथे दररोज कोणीतरी मरतो आणि त्याला मोक्ष मिळतो. ही आकडेवारी लोकांची या ठिकाणाप्रतीची श्रद्धा दर्शवते.
काशीमध्ये भगवान भैरव यांना शहराचे रक्षण करणारा कोतवाल मानले जाते. तो शिवाचा गण आहे आणि येथे मृत्यूमूखी पडणाऱ्यांच्या आत्म्यांना तो मोक्ष देतो. लोक त्याची पूजा करतात.
काशीमध्ये मृत्यूची प्रथा हिंदू धर्माच्या प्राचीन श्रद्देशी जोडलेली आहे, जिथे हा भगवान शिवाचा आशीर्वाद मानला जातो. प्राचीन काळापासून लोक येथे शेवटचा श्वास घेण्यासाठी येत आहेत आणि या परंपरेला चालना देण्यासाठीच मुक्ती भवन बनवण्यात आले आहे.