वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्सचे असंतुलन, मासिक पाळीच्या समस्या, शारीरिक आणि मानसिक समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. हल्ली कमी वयातच महिला अनेक वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. शरीरात निर्माण झालेला पोषक घटकांचा अभाव आजार होण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे वय वाढल्यानंतर महिलांनी आहारात या पदार्थांचे सेवन करावे. या पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे महिला कायमच निरोगी राहतात. (फोटो सौजन्य – istock)
वयाच्या ३० शी नंतर महिलांनी आहारात करावे 'या' पदार्थांचे सेवन
महिलांच्या आरोग्यासाठी जवस वरदान ठरतात. सकाळी उठल्यानंतर नियमित एक चमचा भाजलेले जवस खावेत. यामुळे हाडांना कॅल्शियम मिळते.
नियमित एक वाटी डाळिंबाचे दाणे खावेत. डाळिंब खाल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते आणि हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. याशिवाय डाळिंब खाल्यामुळे फायब्रॉईडचा त्रास होत नाही.
विटामिन सी युक्त आवळ्याचे नियमित केल्यास केसांचे आरोग्य निरोगी राहील. केस मजबूत आणि मुलायम ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात पुदिन्याच्या पानांचे नियमित सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरात थकवा टिकून राहतो आणि ऍसिडिटी कमी होते.
फायबर आणि ओमेगा ३ ने समृद्ध असलेले चिया सीड्स पाण्यात भिजवून प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल आणि शरीर कायमच फिट राहील .