त्वचेवरील नैसर्गिक सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी बाजरातील स्किन ब्राइटनिंग क्रीम लावतात तर कधी महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. मात्र त्वचेवरील नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट नाहीतर आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्वचा कायमच सुंदर ठेवण्यासाठी त्वचेला बाहेरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आरशासारख्या चमकदार त्वचेसाठी आहारात कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर येईल आरशासारखी चमक! आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश,
सकाळच्या नाश्त्यात नेहमी ताज्या फळांचे सेवन करावे. तर दुपारच्या जेवणात पौष्टिक भाज्या खाव्यात. अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध असलेली फळे आणि भाज्या त्वचेला योग्य ते पोषण देतात.
विटामिन सी युक्त आवळ्याचे नियमित सेवन केल्यास त्वचा कायमच तरुण राहील. वयाच्या ६० व्या वर्षी कायम तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी नियमित आवळ्याचा रस किंवा आवळा खावा.
विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध असलेली बेरी, स्ट्रोबरी किंवा रासबेरी नेहमीच खावी. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. ग्रीन टी केवळ वजन कमी न होता त्वचासुद्धा सुंदर होते.
सुंदर चमकदार त्वचेसाठी नियमित काजू, बदाम खावेत. यामध्ये झिंक, ओमेगा-३ फॅटी ऍसिड, प्रथिने आणि सेलेनियम आढळून येते, जे त्वचेला पोषण देते. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल.