असूनही नसल्यासारखे असणारे काही भाग नेहमीच आकर्षणाचे असतात. जर तुम्ही अशा जागांच्या शोधात असाल तर तुमच्या शोधमोहिमेला आता पूर्णविराम द्या. कारण या लेखामध्ये असे काही दुर्गम विभाग वाचण्यात येणार आहेत, ज्या बद्दल तुम्ही क्वचितच कधी ऐकलं असेल किंवा कधी ऐकलं ही नसेल. चला तर मग जाणून घेऊयात 'या' जागांबद्दल:
फोटो सौजन्य - Social Media
ट्रिस्टन डा कुन्हा हे बेट अटलांटिक महासागराच्या मध्यात येते. येथे जाण्यासाठी तब्ब्ल आठवडाभराचा प्रवास करावा लागतो. येथे वस्ती असली तरी ती फार काही दाट नाही.
ग्रीनलंडच्या पूर्व किनाऱ्यावरचे इटोक्कोर्टोर्मीत शहर वर्षभर बर्फाच्छादित असते. येथे जाण्यासाठी विशेष उड्डाणे आणि बोटींचा उपयोग करावा लागतो.
हिंदी महासागरात वसलेले ला रिन्योन बेट ज्वालामुखी, दऱ्या आणि दाट जंगलांनी वेढलेले आहे, त्यामुळे अंतर्गत प्रवास फार कठीण आहे.
ब्रिटनच्या अधिपत्याखालील पितकेर्न बेटे हे बेट पॅसेफिक महासागरात स्थित आहे. या बेटांवर पोहोचण्यासाठी केवळ बोटींवर अवलंबून राहावे लागते. येथे फारच मोजकी लोकवस्ती आहे.
दक्षिण महासागरात वसलेले मॅक्वेरी आयलंड मानववस्तीपासून हजारो किलोमीटर दूर आहे. येथे केवळ संशोधनासाठीच लोक जातात.