प्रत्येक महिन्याप्रमाणे येत्या सप्टेंबर महिन्यात देखील अनेक मोठे आर्थिक बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडर आणि एफडीचे नियम समाविष्ट आहेत. हे बदल तुमच्या महिन्याच्या खर्चावर परिणाम करू शकतात. याशिवाय सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (डीए वाढ) भेट देऊ शकते. पुढच्या महिन्यापासून काय बदल होणार आहेत. हे जाणून घेऊया...
उद्यापासून बदलणार 'हे' सहा आर्थिक नियम, वाचा... तुमच्या खिशावर काय परिणाम होणार! (फोटो सौजन्य - istock)
एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल होणार असून, व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर बदलणार आहे.
एलपीजी सिलिंडरसोबतच हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतींमध्येही उद्यापासून बदल होणार आहे.
HDFC बँकेने आपल्या युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स देण्याची मर्यादा निश्चित केली. जी उद्यापासून लागू होणार आहे.
केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली जाऊ शकते.
सरकारने मोफत आधार अपडेट करण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
IDBI बँक, इंडियन बँक, पंजाब बॅंक, सिंध बँक, एसबीआय बॅंक यांनी आपल्या विशेष एफडीची मुदत 30 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.