सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात तब्बल १२०० ते १३०० रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेची दयनीय अवस्था समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ओरोस वगळता इतर ग्रामीण रुग्णालयांना किती वेळा भेट दिली असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनावर टीका केली. तसेच पालकमंत्री, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि जिल्हा शल्यचिकित्सक हेच या परिस्थितीस जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.