जर तुम्हाला हॉरर चित्रपटांची आवड असेल, तर काही चित्रपट पाहताना हनुमान चालीसा म्हणण्याची गरज भासू शकते! काही सिनेमे इतके भितीदायक असतात की, त्यातील दृश्ये मनात घर करून राहतात. असेच काही भारतीय हॉरर चित्रपट आहेत, जे पाहताना अंगावर काटा येईल आणि मनात भीती दाटून येईल.
'हे' हॉरर चित्रपट नक्की पहा. (फोटो सौजन्य - Social Media )
तुंबाड हा फक्त एक हॉरर चित्रपट नाही, तर एक अद्भुत व्हिज्युअल एक्सपीरियन्स आहे. तुंबाड गावात राहणाऱ्या लोकांवर प्राचीन शाप आहे आणि तिथला दैवी खजिना मिळवण्यासाठी माणसं कोणत्याही थराला जातात. हा चित्रपट पाहताना तुम्हाला अनेकदा धडकी भरू शकते!
दुर्गामती ही एक सुपरनॅचरल थ्रिलर फिल्म आहे, ज्यात एक महिला तुरुंगात असताना एका भुताटकीच्या हवेलीमध्ये नेली जाते. तिथे तिच्याबरोबर जे घडतं ते अंगावर काटा आणणारं आहे. भव्य सेट, भयानक दृश्ये आणि उत्कंठावर्धक कथा यामुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरतो.
नेटफ्लिक्सवरील बुलबुल हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरला आहे. हा एक मिस्टिकल आणि हॉरर थ्रिलर आहे, ज्यात स्त्रीशक्ती, अन्याय आणि प्रतिशोधाची कहाणी आहे. चित्रपटाचा भुताटकीचा माहोल आणि लालसर दृश्ये तुमच्या मनावर ठसा उमटवतील.
अनुष्का शर्माच्या परी या चित्रपटात पारंपरिक हॉररपेक्षा वेगळा अंधारलेला आणि रहस्यमय अनुभव आहे. यात कोणत्याही अतिशयोक्तीपूर्ण हॉरर क्लिशे नाहीत, पण तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना भीतीदायक वातावरणात गुरफटून टाकतो.
छोरी हा साक्षी तंवरच्या मुख्य भूमिकेत असलेला सिनेमा आहे, जो एका गरोदर महिलेच्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक घटनांवर आधारित आहे. चित्रपटाची कथा, संगीत आणि सिनेमॅटोग्राफी अशा प्रकारे सादर केली आहे की प्रेक्षकांना भीतीचा अनुभव येईल.