प्रत्येकाच्या आवडीचा विषय म्हणजे विकेंड. अनेकजण विकेंड म्हटला की गेट टू गेदर किंवा सिनेमाला जातात. बऱ्याचदा रोजच्या रुटीनमुळे हाच विकेंड अनेकदा कंटाळवाणा वाटतो. तुम्हालाही जर तुमचा विकेंड खास बनवायचा असेल किंवा तुम्हालासुद्धा फिरायला आवडत असेल तर सह्याद्रीतील या ठिकाणच्या धबधब्यांना विकेंडला नक्कीच भेट द्या.
काळू धबधबा : ठाण्यापासून जवळ मुरबाड परिसरात काळू धबधबा आहे. हा धबधबा माळशेज आणि नाणेघाटावरुन देखील जवळ आहे. सुमारे 1200 फूट उंचावरुन हा धबधबा कोसळतो.
नाणेमाची धबधबा: नाणेमाची धबधबा हे ठिकाण महाराष्ट्रातील दापोली तालुक्याजवळ, महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे. निसर्ग प्रेमी, ट्रेकर्ससाठी हे अत्यंत साजेसं ठिकाण आहे.
देवकुंड धबधबा: देवकुंड धबधबा हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात येतो. ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी कोसळणारा हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
कुंभे धबधबा: सह्याद्रीतील घनदाट हिरवळ आणि अभेद्य डोंगरातून सुमारे 175 फूट ऊंचीवरु कोसळणारा कुंभे धबधबा. माणगाव शहरापासून जवळ असलेल्या कुंभेवाडी गावात हा धबधबा आहे.
लिंगमळा धबधबा: महाबळेश्वर-पंचगणी रोडवर, सह्याद्रीच्या हिरव्या कुशीत वसलेला एक भव्य आणि बहु-टप्प्यांतील म्हणजे लिंगमळा धबधबा. सातारा जिल्ह्यात, महाबळेश्वरपासून सुमारे 6 किमी अंतरावर वेण्णा नदीच्या पात्रात हा धबधबा आहे.