डिसेंबर महिन्यात लग्न समारंभ, साखरपुडा इत्यादींचे मुहूर्त असतात. लग्न म्हंटल की घरी मोठी गडबड असते. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच लग्नाच्या खरेदीला सुरुवात केली जाते. लग्नात महिला प्रामुख्याने नऊवारी साडी नेसताना. नऊवारी साडी नेसल्यानंतर नेमकी काय हेअर स्टाईल करावी, असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नात नऊवारी साडी नेसल्यानंतर कोणती स्टायलिश आणि पारंपरिक हेअर स्टाईल करावी, याबद्दल सांगणार आहोत. या पद्धतीची हेअर स्टाईल केल्यास केस आणि तुमचा लुक खूप सुंदर, उठावदार दिसेल. (फोटो सौजन्य-pinterest)
लग्नात नऊवारी साडीवर करा 'ट्रेंडी पारंपरिक' हेअरस्टाईल

अनेकदा लग्नात तयारी करताना जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी घाईगडबडीमध्ये तुम्ही या पद्धतीची हेअर स्टाईल करू शकता. या पद्धतीची हेअर स्टाईल करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

नवनवीन पद्धतींचा वापर करून हेअर स्टाईल केली जाते. वेणी बांधून तुम्ही या पद्धतीची सुंदर हेअर स्टाईल करू शकता.

लग्नामध्ये नऊवारी साडी नेसल्यानंतर तुम्ही खोपा हेअर स्टाईल करू शकता. खोपा बांधल्यानंतर त्यावर तुम्ही चाफा किंवा गुलाबाच्या पाकळ्या लावून हेअर स्टाईल करू शकता.

हल्ली मेसी बन मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला आहे. मेसी बन बांधल्यानंतर केस खूप सुंदर आणि उठावदार दिसतात. नऊवारी साडीवर मेसी बन तुम्ही बांधू शकता.

जर तुम्हाला थोडी युनिक हेअर स्टाईल हवी असेल तर तुम्ही या पद्धतीची हेअर स्टाईल नऊवारी साडीवर करू शकता.






