नागपुरात राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. लाडकी बहीण योजनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारे नाना पटोले यांच्या जवळचेच असल्याचा आरोप करत, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा समोर आला असल्याचे बावनकुळे म्हणाले. ही योजना आचारसंहितेशी संबंधित नसून हक्काचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणारच, असा ठाम दावा त्यांनी केला.