अटक आणि चौकशीनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी मी नेहमीच बोलत राहील अशी प्रतिक्रिया डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटन स्थित संग्राम पाटील कोरोना काळात प्रकाश झोतात आले होते. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध ते नेहमी आवाज उठवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून त्यांना विमानतळावर अटक करण्यात आली होती. पंधरा तास त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका झाली.